मुंबई : वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असल्याचं दिसून येतं आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षनेत्यांवर आरोप करत आहेत की, हा प्रकल्प राज्यातून सत्ताधाऱ्यांकडून गेला. तर सत्ताधारी म्हणत आहेत की, महाविकास आघाडी सरकारमुळे गेला. अशातच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच सुनावलं आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
हे धादांत खोटं आहे. वेदांता कंपनीचं ते ट्वीट आल्यानंतर हे सगळं समजलं. आता तीन महिने झाले यांना मुख्यमंत्री होऊन म्हणजे 90 दिवस. काही कमी नाहीयेत. स्वत: प्रयत्न करायचे नाहीत. कित्येक दिवस तर ते दोघंच मंत्रीमंडळात होते. त्यावेळी मोठे प्रकल्प वगैरे याबात प्रयत्न करायला हवे होते, असं म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.
पुढे बोलताना पवार असंही म्हणाले की, ते तर म्हणत होते की आम्ही दोघं खंबीर आहोत. म्हणूनच अजूनही पालकमंत्री नेमलेले नाहीत. ते काय सांगतायत? तीन तीन महिने तुम्हाला पालकमंत्री नेमता येत नाहीत. इतकी कामं, इतक्या कमिट्या असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. खूप गोष्टी असतात. त्यावर काही करत नाहीत आणि आम्ही काही बोललो की हे असंच बोलतात वगैरे सांगतात.
तसेच अजित पवार म्हणाले की, आम्ही वस्तुस्थितीला धरून बोलतो. यावरून लक्ष बाजूला जाण्यासाठी ते लोक तिसरंच काहीतरी काढताता, असा आरोपही अजित पवार यांनी विरोधकांवर केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- NCP | “…असं शक्य झालं नाही, तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?”, राष्ट्रवादीचा खोचक सवाल
- Hero Splendor | हिरो स्प्लेंडर प्लस नवीन रंगात..! काय विशेष आहे ते जाणून घ्या!
- Health Hack | शाकाहारी लोकांनी प्रोटीन कसे आणि कुठून मिळवावे, जाणून घ्या!
- Raj Thackeray | प्रबोधानकार ठाकरेंच्या जयंती निमीत्त राज ठाकरेंनी करुन दिली ‘त्या’ भाषणाची आठवण
- Supriya Sule | “… एवढ्या मोठ्या नाहीत ताई”, सुप्रिया सुळेंच्या ट्विटवर संदीप देशपांडेंचा टोला


