Share

Ajit Pawar | “दादा वाचून यांचं काय नडतं कुणाला माहिती” ; नाराजीच्या चर्चेनंतर अजित पवार पहिल्यांदा बोलले

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसते नेते व राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Opposition leader Ajit Pawar) हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मावळमधील विविध कार्यक्रमांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी हजेरी लावली. शिंदे गटातील नेते, कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) आक्रमक झाला होता. सर्व नेते सत्तारांवर टीका करत होते. मात्र यावेळी अजित पवार गप्प होते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील मेळाव्यानंतर ते नॉट रीचेबल होते. दरम्यान अजित पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांसमोर आले.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या खास शैलित झालेल्या आरोपांचे खंडन केले आहे. अजित पवार म्हणाले, मी नाराज असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मी पाच दिवस आजारी होतो. मला खोकला लागला होता. त्यामुळे मी लोकांसमोर आलो नाही.”

अजित पवार म्हणाले, “६ महिन्यापूर्वी दौरा ठरलेला होता. त्या दौऱ्याकरीता ४ तारखेला रात्री उशीरा फ्लाईट पकडून गेलो आणि काल रात्री उशिरा आलो. पण इथे माझ्याबद्दलच्या काहीही बातम्या सुरू होत्या. गैरसमज निर्माण करण्यात आला. हे बरोबर नाही.”

यावेळी अजित पवार यांनी अफवा पसरवणाऱ्यांना चांगलेच खडसावले, अनेक बातम्या उठवण्यात आल्या की दादा इकडे गेले, दादा तिकडे गेले. दादा नाराज आहेत. दादा वाचून यांचं काय नडतं कुणाला माहिती. दादाला काही खासगी लाईफ आहे की नाही?, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला.

काय होती चर्चा-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीतील सर्व नेते सत्तारांच्या वक्तव्याचा विरोध करत आहेत. मात्र विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मौन बाळगले होते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. अजित पवार – शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यात मतभेद असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील यावर प्रश्न उपस्थित केले होते.

एकीकडे संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होती. मात्र अजित पवार नॉट रीचेबल होते. अब्दुल सत्तार यांनी  खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि अजित पवारांनी साधे ट्वीट देखील केले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!