🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट (Cricket) संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये आपले कर्तुत्व दाखवल्यानंतर तो आता फिल्मी दुनियेमध्ये (Film Industry) पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. क्रिकेट प्लेअर एम एस धोनी आता लवकरच चित्रपट सृष्टीमध्ये मध्ये पदार्पण करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तो तामिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहे. माही प्रोडक्शन बॅनर धोनी एंटरटेनमेंट तामिळ मध्ये काही चित्रपटांची निर्मिती करत आहे. तर लोकेश कनागराजच्या आगामी चित्रपटांमध्ये महेंद्रसिंग धोनी अभिनेता म्हणून दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) चे चित्रपटसृष्टी मध्ये पदार्पण
Indiaglitz ने दिलेल्या बातमीनुसार, दिग्दर्शक लोकेश कनागराज यांनी त्यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपटासाठी महेंद्रसिंग धोनीला अप्रोच केल्याची माहिती समोर आली आहे. तर एम एस धोनी या चित्रपटांमध्ये सहाय्यकाचे भूमिकेत दिसणार असून या चित्रपटांमध्ये थलपथी विजय मुख्य अभिनेत्याची भूमिका करणार आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल अजून कुठली अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण काही मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे नाव ‘थलपथी 67’ असे ठेवण्यात आले आहे. दरम्यान, एम एस धोनी या चित्रपटांमध्ये दिसणार आहे की नाही याची अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
धोनीच्या प्रोडक्शन मध्ये बनणाऱ्या पहिल्या तामिळ चित्रपटांमध्ये नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटांमध्ये संजय दत्त असल्याच्या बातम्या देखील समोर आले आहेत. माहीच्या प्रोडक्शन अंतर्गत बनणाऱ्या या पहिल्या चित्रपटाचे शीर्षक ‘अथर्व-द ओरिजिनल’ असे असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. दोन्हीची प्रोडक्शन कंपनी कोणत्या प्रकल्पांवर काम करेल किंवा लोकेश कनागराजच्या चित्रपटातून महेंद्रसिंग धोनी डेब्यू करेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
लोकेश कनागराज यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘विक्रम’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. या चित्रपटातून अभिनेता कमल हसन यांनी चित्रपट सृष्टी मध्ये पुनरागमन केले आहे. विक्रमच्या यशानंतर लोकेश कनागराज यांना पुन्हा अशाच एका सुपरहिट प्रोजेक्टवर काम करायचे आहे. पण त्यांच्या येणाऱ्या या आगामी चित्रपटांमध्ये महेंद्रसिंग धोनी असणार की नाही याबद्दल त्यांनी अजून उघड माहिती दिलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
- Udayanraje bhosale | ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न’; यावर उदयनराजे म्हणतात…
- Thackeray vs FadnAvis | तपास यंत्रणाच्या कारवायांवरुन ठाकरे-फडणवीस सामना रंगला! वार-पलटवार वाचा
- Sushma Andhare । “…ही फक्त तयारीची सुरुवात आहे”; राऊतांच्या सुटकेनंतर सुषमा अंधारेंचा इशारा
- T20 World Cup | जोस बटलर आणि ॲलेक्स हिल्स यांनी रचला टी 20 विश्वचषकात ‘हा’ विश्वविक्रम
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकाच मंचावर; वंचित आणि ठाकरे गटाची युती होणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

