Share

T20 World Cup | जोस बटलर आणि ॲलेक्स हिल्स यांनी रचला टी 20 विश्वचषकात ‘हा’ विश्वविक्रम

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: काल टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमधील दुसरा उपांत्य फेरी सामना भारत (India) आणि इंग्लंड (England) या संघामध्ये ॲडलेड येथे पार पडला. या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंड संघाने हा सामना आपल्या नावावर केला. हा सामना जिंकल्यानंतर इंग्लंड संघाला टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेमध्ये स्थान मिळाले आहे. या सामन्यांमध्ये इंग्लंडने भारतावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. तर, प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने इंग्लंड संघाला 169 धावांचे लक्ष दिले होते. हे लक्ष इंग्लंड संघाने अवघ्या 16 शंटकांमध्ये पूर्ण केले. त्याचबरोबर इंग्लंड संघाचे सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) आणि अलेक्स हेल्स (Alex Hales) या जोडीने हे लक्ष पूर्ण करत त्यांच्या नावावर एक नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे.

काल मिळालेल्या विजयामध्ये इंग्लंड संघाचे सलामीवीर जोस बटलर आणि ॲलेक्स हेल्स यांचा महत्त्वाचा वाटा होता. या दोघांनी एकही विकेट न जाऊ देता संघाला लक्षापर्यंत पोहोचवले. यामध्ये जोस बटलर याने 80 नाबाद धावा केल्या, तर अलेक्स हिल्सने 68 नाबाद धावांची खेळी खेळली. दोन्ही फलंदाजामध्ये पहिल्या विकेटसाठी नाबाद 170 धावांची भागीदारी झाली. त्याचबरोबर या भागीदारीच्या जोरावर बटलर आणि हिल्स यांनी टी 20 विश्वचषकात नवीन विश्वविक्रम केला.

जोस बटलर आणि ॲलेक्स हेल्स यांची झालेली ही भागीदारी टी 20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉक आणि रिले रुसो यांच्या नावावरील हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. क्विंटन डीकॉक आणि रिले रुसो यांनी  बांगलादेश विरुद्धच्या सामन्यांमध्ये 168 धावांची भागीदारी केली होती. कालच्या सामान्यानंतर जोस बटलर आणि अलेक्स हिल्सने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

दरम्यान, काल झालेल्या उपांत्य फेरीमध्ये इंग्लंड संघाने भारतीय संघावर 10 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवले आहे. 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये टी 20 विश्वचषक सामन्यातील अंतिम सामना पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!