🕒 1 min read
Ajit Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसेभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून म्हणावे तसे काम होताना दिसत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झालं आहे. सरकार आल्यापासून पोलीस विभाग प्रचंड तणावाखाली काम करत आहे, असे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा चांगलाच समाचार घेतला.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना केलेली शिवीगाळ आणि जिल्हाधिकाऱ्यांना दारुसाठी विचारल्यावरुन अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. मी दिवाळीपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेगवेगळी भेट घेऊन त्यांना इशारा दिला होता. तुमच्या सरकारमध्ये वाचाळवीरांचे प्रस्थ वाढलं आहे, असे अजित पवार म्हणाले.
“चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का, दूध पाहिजे का असं सामान्य लोक विचारतात. पण त्यानंतरही दारू पिता का, असं विचारण्यापर्यंत मंत्र्यांची मजल गेली आहे. यानंतर मी हे सहज म्हणालो, असेही बोलतात. सहज बोलायला तुम्ही समान्य नागरिक नाहीत. मंत्री आहात. जबाबदार आहात”, अशा शब्दात अजित पवार यांनी सत्तारांचा समाचार केला.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही अडीच वर्ष काम केलं आहे. जरी आज ते मुख्यमंत्री असले तरी त्यांनी सगळ्या वाचाळवीरांना आवरावे. त्यांना ताबडतोब सूचना द्याव्या. महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लागू देऊ नका, महाराष्ट्राच्या परंपरेला आपण जपलं पाहीजे, ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. फार विदारक चित्र आज महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे, असे अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Vinayak Raut | “राजन साळवी शिंदे गटात सामील होणार?”; विनायक राऊत म्हणाले, “खाल्ल्या मिठाला…”
- Ajit Pawar | “वाचाळविरांना आवरा” ; अजित पवारांचे एकनाथ शिंदेंना आव्हान
- Arvind Sawant | “रात्रीस खेळ चाले!”, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंंत्र्यांच्या भेटीवर अरविंद सावंतांची टीका
- Rohit Pawar | “कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही”; रोहित पवारांचा विरोधकांना इशारा
- सारा अली खान ला डेट करतोस का? शुभमन गिल म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
