🕒 1 min read
Rohit Pawar | अहमदनगर : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे सत्ताधारी पक्षांवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ट्विटच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.
रोहित पवार म्हणाले, “राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवरून युवांमध्ये वाढणारा तीव्र असंतोष आणि #BharatJodo यात्रेला मिळणाऱ्या तुफान प्रतिसादामुळं धडकी भरल्याने मीडियाचं लक्ष हटवण्यासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याची चर्चा आहे. पण लक्षात ठेवा…कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही.!” अशा आशयाचं ट्विट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलंय.
राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवरून युवांमध्ये वाढणारा तीव्र असंतोष आणि #BharatJodo यात्रेला मिळणाऱ्या तुफान प्रतिसादामुळं धडकी भरल्याने मीडियाचं लक्ष हटवण्यासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याची चर्चा आहे.
पण लक्षात ठेवा…कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही!— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 15, 2022
काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या भारत जोडो यात्रेचे स्वागत केले आहे. यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे सत्ताधाऱ्यांना धडकी भरली असल्याचं पवार म्हणालेत.
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला होता. तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील कारवाईबाबत देखील रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं होत. याचा संदर्भ जोडत त्यांनी हे ट्विट केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- सारा अली खान ला डेट करतोस का? शुभमन गिल म्हणाला…
- Amruta Fadanvis | आम्ही ब्राह्मण आहोत याचा आम्हाला गर्व – अमृता फडणवीस
- Sanjay Raut Birthday | “रोज सकाळी ९ वाजता अनेकांचे १२ वाजवणारे…”, संजय राऊतांना रोहित पवारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Vinayak Raut | “येत्या सहा महिन्यात १०० टक्के मध्यावधी निवडणुका लागणार” ; विनायक राऊत यांचा दावा
- Amruta Fadanvis | “…म्हणून मोदी आणि वरच्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं”; अमृता फडणवीसांनी सांगितलं कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
