Share

जयंत पाटलांची पक्षावरील पकड कमी झालीय का?

Published On: 

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करत शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवलं आहे. पण हा विजय राष्ट्रवादी आणि विशेषतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरतोय कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपच्या या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून पक्षनेतृत्वाचा विरोध असतानाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी महापौर निवडणुकीत भाजपला साथ दिली असल्याचं समोर आलं आहे.

‘या निवडणुकीत भाजपला मदत न करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्थानिक नेत्यांना दिले होते.मात्र प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नगरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला मदत केल्याचं उघड आहे. जयंत पाटलांची पक्षावरील पकड कमी झालीय का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

आज सकाळी भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक एकाच गाडीतून आले. यानंतर भाजपचे महापौरपदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे व राष्ट्रवादीचे उमेदवार संपत बारस्कर यांनी हातात हात घालूनच महापालिकेत प्रवेश केला. यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीच्या संपत बारस्कर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बाबासाहेब वाकळे यांचा महापौरपदाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या मदतीमुळेच भाजपचा महापौर होऊ शकला आहे.

जयंत पाटलांची सारवासारव

अहमदनगरमध्ये भाजपला पाठिंबा देऊ नये, असे स्पष्ट आदेश पक्षाकडून देण्यात आले होते. पाठिंबा देणाऱ्या नागरसेवकांकडून पाठिंबा दिल्याबद्दल सप्ष्टीकरण मागितले जाईल. तसेच, पक्ष शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

अहमदनगर महापालिका निवडणूक अंतिम निकाल 2018 :

शिवसेना – 24
राष्ट्रवादी -18
भाजप -14
काँग्रेस – 5
बसपा – 04
समाजवादी पक्ष – 01
अपक्ष 2
एकूण – 68

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!