🕒 1 min read
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी लोकसभेमध्ये बोलताना अनेक मुदद्यांवरुन केंद्रातील भाजप सरकारला धारेवर धरले आहे. आज लोकसभेमध्ये बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी सामान्य जनतेच्या हितासाठी केंद्राने पेट्रोल डिझेल आणि घरातील गॅसचे दर कमी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ईडी सीबीआयच्या कारवायांवरुनही सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
राजकारण करायचेच आहे, तर हल्ले समोरून करा, बायका मुलांवर हल्ले कशाला? असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर टीक केली आहे. सीव्हीसी विधेयक आणि दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट विधेयकावर बोलताना सुळे यांनी ही टीका केली आहे.
ईडी आणि सीबीआयचे छापे केवळ विरोधकांवरच होत असल्याचा आरोपदेखील यावेळी त्यांनी केला. ईडी आणि सीबीआय (ED & CBI Raid on Politician) या संस्थांचा राजकीय वापर होत आहे, असे सुप्रिय सुळे म्हणाल्या आहेत.
यापूर्वीचे छापे हे राजकीय नेत्यांवर करण्या येत होते, मात्र, आता ही कारावाई नेत्यांच्या बायका मुलांवरदेखील केली जात आहे. (CBI Raid On Politician Family) त्यामुळे हल्ले करायचेच असतील तर, समोरून करा, बायका मुलांवर हल्ले कशाला?, असा प्रश्न यावेळी सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचार, खंडणी, वसुली यापलिकडे मविआचे कुठलेच कर्तृत्व नाही’
- …’शाहजादे’ राज्य करत आहेत; कोहलीच्या कर्णधार पदावरून राऊतांची प्रतिक्रिया
- भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार- पंतप्रधान मोदी
- नितेश राणेंचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज; हिम्मत असेल तर….
- दिलासादायक! पुण्यातील ओमायक्रॉनचे रुग्ण ठणठणीत; उपमुख्यमंत्र्यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
