Share

Aditya Thackeray | याआधी एवढा निर्लज्जपणा कोणी केला नव्हता-आदित्य ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आणि शिंदे गट दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. दादरच्या शिवाजी पार्कवर होणारा हा मेळावा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 1966 पासून शिवसेना दरवर्षी येथे दसरा मेळावा घेत आहे. मात्र यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.अशातच शिवसेना पक्षाचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला आहे.

आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य-

गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेनेमधून जे नेते गेले आहेत त्यापैकी कोणीच एवढा निर्लज्जपणा दाखवला नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला आहे. गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आदित्य ठाकरे गेले असता. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेचा गेल्या 60 वर्षांचा इतिहास आहे. अनेक नेते शिवसेना सोडून गेलेले आहेत. त्या सर्व नेत्यांना एकत्रित करण्याचं काम शिंदे गट करतंय का? असा सवाल विचारला असता, त्यावेळी ते बोलत होते.

लवकरच मुखवटे फाटणार-

दसरा मेळाव्याच्या संदर्भातही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, दसरा मेळावा हा शिवसेनेचाच असतो. आपल्याला माहित आहे काही-काही लोक मुखवटे घालून फिरत आहेत.पहिले मुखवटे असे होते की, आमच्यावर प्रेम आहे, आमच्याबद्दल आदर आहे, तर आता तो मुखवटा फाटला आहे. दुसरा मुखवटा असा आहे की, काहीजण शिवसेना-शिवसेना म्हणत फिरत आहेत. परंतू जी खरी शिवसेना आहे, ती उद्धव साहेबांबरोबर जी उभी आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेकडे मेळावा घेण्याच्या परवानगीसाठी अर्ज केले आहेत. पालिका कोणाला परवानगी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!