Share

Ambadas Danave | “…तर राज्यपालांचा पक्षपातीपणा स्पष्ट होईल”; अंबादास दानवे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  :  एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गट अशी विभागणी झाली आहे. शिंदे गटाला ठाकरे गटातील पक्षनेते गद्दार म्हणून डिवचत आहेत. भाजपसोबत परस्पर युती केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटातील नेते त्यांच्यावर खार खाऊन असतात. अशातच महाविकास आघाडीचे सरकार असताना विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीने पाठवलेली 12 नावांची यादी खूप दिवसांपासून लांबणीवर असताना. अशातच ती 12 नावांची यादी रद्द करा असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवले असल्याचं समजतं आहे. यामुळे एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातील दरी आणखिण वाढणार असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी एक वक्तव्य केलं आहे.

अंबादास दानवे यांचे वक्तव्य-

महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेसाठी जी बारा नावं पाठवली होती, त्याबाबतचा निर्णयही न्यायालयात आहे, त्यामुळे तो निर्णय लांबणीवर पडला, असं अंबादास दानवे यांनी सांगितले आहे. दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

याबाबत राज्यपालांचा निर्णयही महत्वाचा असला तरी, राज्यपाल ही 12 नवांची यादी रद्द करू शकत नाही. जर राज्यपालांनी असं केलं तर त्यांचा पक्षपातीपणा स्पष्टपणे दिसून येईल, असंही अंबादास दानवे म्हणाले आहेत.

दानवे यांचा सरकारला इशारा-

तसेच, एकनाथ शिंदे यांच्या पत्रामध्ये शिंदे-भाजप सरकार नवीन 12 नावांची यादी पाठवणार असल्याचंही म्हटलं आहे. यावर दानवे म्हणाले आमची यादी राज्यपालांनी रद्द करू नये. कारण हा निर्णय कॅबिनेटचा होता. जर 12 नावांची यादी रद्द झाली तर आम्ही त्यांच्या या भूमिकेला विरोध करणार असल्याचा इशाराही त्यांनी याठिकाणी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!