Share

Raosaheb Danave | भाजप पक्षाला दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही- रावसाहेब दनवे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काँग्रेस पक्षातील 12 आमदार शिंदे गटामध्ये सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यातच काँग्रेस पक्षाचे नेते चव्हाण यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वरळी येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच भाजप पक्ष फोडण्याचेच काम करत असल्याचं विरोधी पक्षनेत्यांकडून बोललं जात आहे. अशातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे.

रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य-

आम्हाला दुसरा कोणताही राजकीय पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. दानवे गणेशोत्सवासाठी कपिल पाटील यांच्या निवासस्थानी आले असता त्यांनी पत्रकरांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

भाजपला कोणाचाही राजकीय पक्ष फोडण्याची गरज नाही. परंतू कुणाच्या पक्षात जर फूट पडत असेल आणि ते जर आम्हाला मदत करत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र यायला तयार आहोत. आम्हाला जेव्हा गरज पडेल आणि उपयोग होईल, तेव्हा जेवढे केवढे असंतुष्ट गट असतील, त्यांचा भाजपसाठी तेव्हा उपयोग करुन घेऊ. आज आम्हाला कुणाचीही गरज नाहीये. आमच्या विचारांशी असंतुष्ट सहमत असतील, तर त्यांना सोबत घेऊ, असं दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय हालचालींमध्ये आणखिण वेगळं वळण येणार असल्याचं दिसून येतं आहेत. तसेच आगामी निवडणुकांमध्ये कोणता पक्ष कोणात्या पक्षाशी युती करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!