Share

Ashok Chavan | अशोक चव्हाण काँग्रेसच्या 12 आमदारांसह भाजपात जाणार?, अशोक चव्हाण म्हणाले…

Published On: 

मुंबई : गुरूवारी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वरळी येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. इतकेच नाही तर चव्हाण यांच्यासह 12 काँग्रेसचे आमदारही भाजपात जाणार असल्याचंही बोललं जात आहे. अशातच अशोक चव्हाण यांनी या सगळ्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अशोक चव्हाण याचं वक्तव्य-

देवेंद्र फडणवीस आणि माझी भेट झाली पण आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. पत्रकारांशी अशोक चव्हाण यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस जरी दुसऱ्या पक्षात असले तरी त्यांची आणि माझी दुश्मनी थोडीच आहे तेव्ही, आम्ही चांगले मित्र आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राजकीय गोष्टींवर आम्ही बोललो नाही-

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये कोणत्याही राजकीय गोष्टींवर आम्ही बोललो नाही, तर आम्ही खासगी गोष्टींवर बोलत होतो. तसेच मी कुठेही जाणार नाहीय, मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.त्यामुळे चालेल्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. त्याचप्रमाणे अशोक चव्हाण असंही म्हणाले की, आज काँग्रेसचं महागाईविरोधात दिल्लीत आंदोलन होतंय. त्यात मी सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काँग्रेसचे 12 आमदार शिंदे गटामध्ये सामील होणार असल्याची माहिती समोर आली होती. आता येणाऱ्या काळातच ठरेल, की काँग्रेसचे 12 आमदार शिंदे गटात जातात की नाही ते.
महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!