Share

‘अजित दादा, आपण ठाकरेंसारखं निव्वळ फोटोसेशन न करता विधिवत पूजा कराल अशी आशा बाळगतो’

Published On: 

सोलापूर : कार्तिकी एकादशी काही दिवसांवर आली असून आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकऱ्यांची परंपरेनुसार पार पडणारी पायी वारी कोरोनामुळे चुकली. पोलिसांसह सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वारकऱ्यांनी घरूनच आपल्या विठू रायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सह कुटुंब पंढरपूर गाठून शासकीय पूजा देखील केली.

मात्र, आता कार्तिकी एकादशी निमित्त वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता यावे यासाठी काही वारकरी संघटना आक्रमक झाल्याचं दिसून आलं. तर, कार्तिकी एकादशीला होणारी शासकीय पूजा पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.

पंढरपूर मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय पूजेचे निमंत्रण देण्यात आले होते. आता, अजित पवार यांनी आपण कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला जाणार असल्याचं आज स्पष्ट केलं आहे. कार्तिकी वारीवर निर्बंध लादण्यात आले असून राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

शासकीय महापूजेवरून भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘मा.अजितदादा, आशा बाळगतो की आपण महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधी म्हणुन पांडुरंगाची ‘विधीवत’ महापूजा कराल,जो सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या भाविक जनतेचे डोळे आसुसलेले असतात. मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्यासारखे विधीवत महापूजा न करता निव्वळ फोटोसेशन करणार नाहीत.’ असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!