Share

४ एप्रिल पर्यंत अजिंठालेणी पुन्हा बंद 

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना संसर्गजन्य परिस्थिती मुळे तब्बल ९ महिने बंद राहीलेल्या जगप्रसिद्ध अजिंठालेणीची दारे १० डिसेंबर रोजी पर्यटकांनसाठी खुली करण्यात आली होती. मात्र यानंतर तीन महिन्यातच कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घालायला सुरुवात केल्याने आज  गुरुवार पासून ४ एप्रिल पर्यंत अजिंठालेणी पुन्हा बंद निर्णय घेण्यात आला आहे.

अजिंठालेणीच्या पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यवसायीकांची अवस्था बिकट झाली आहे.मागच्या १७ मार्चला केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालयाने देशभरातील पर्यटनस्थळा सह अजिंठालेणी पर्यटकांनसाठी बंद केली होती. यानंतर तब्बल ९ महिने अजिंठालेणी बंद राहील्याने येथील पर्यटन व्यवसायीकांची प्रचंड आर्थिक कुचंबणा झाल्याचे दिसून आले होते. या नंतर १० डिसेंबर रोजी अटीशर्तीवर अजिंठालेणी पुन्हा पर्यटकांना खुली करण्यात आली होती, यावेळी नवीन उमेदीने पर्यटक व्यवसायिकांनी आपले व्यवसाय सुरु करुन घसरलेली आर्थिक स्थिती पून्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरु केला होता.

दरम्यान, ११ मार्च पासून ४ एप्रिल पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अंशत लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे दि.११ गुरुवार पासून ४ एप्रिल पर्यंत पर्यटकांसाठी अजिंठालेणी पून्हा बंद राहणार आहे. या संपूर्ण प्रकाराने अगोदरच आर्थिक संकटात सापडेल्या येथील पर्यटन व्यवसायीकांची अवस्था पुन्हा बिकट होण्याचे व्यावसायिकाकडून सांगण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!