Share

कसोटीतील निवृत्तीच्या वृत्तावर जडेजाचे सूचक ट्विट

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा  (Indian Cricket Team) महान अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)  दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा (SA vs IND) भाग नाही. नुकताच तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला पण दुखापतीमुळे तो दुसरा कसोटी सामना खेळू शकला नाही. रवींद्र जडेजाच्या जवळच्या मित्राने आणि त्याच्या सहकाऱ्याने दिलेल्या महिनुसार जडेजा दुखापतीमुळे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे सामोर आले होते.

रवींद्र जडेजाची दुखापत इतकी गंभीर आहे की, त्याला बरे होण्यासाठी 4 ते 6 महिने लागू शकतात. जडेजाच्या एका सहकाऱ्याने असेही सांगितले होते की, रवींद्र जडेजा दीर्घकाळ एकदिवसीय आणि टी-२० खेळण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. रवींद्र जडेजाची दुखापत इतकी गंभीर आहे की तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेतही खेळताना दिसणार नाही. रवींद्र जडेजा कदाचित IPL 2022 मध्ये खेळताना दिसेल.

दुखापतीमुळे रवींद्र जडेजा लवकरच कसोटी क्रिकेटला रामराम ठोकणार अशा बातम्या येत असतानाच जडेजाने एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये तो खरंच निवृत्ती स्वीकारणार की नाही याबाबत संकेत दिले आहे. कसोटीतून निवृत्तीच्या बातम्यांवर जडेजाने एक ट्विट केले. त्याने स्वतः कसोटी जर्सी घातलेला एक फोटो पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शन देत त्याने लिहिले, ‘आणखी खूप दूर जायचे आहे’
जडेजाने केलेले हे सूचक ट्विट पाहता जडेजा इतक्यात लवकर कसोटीतून निवृत्ती स्वीकारणार नाही असे चित्र दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!