🕒 1 min read
नवी दिल्ली – एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात आता कार्ती चिंदबरम यांच्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने कार्ती यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याभोवती फास आवळण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, चिदंबरम यांच्या अटपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी करताना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कोर्टाने ईडीला ५ जूनपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या कोर्टात चिदंबरम यांच्यावतीने काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत.
यापूर्वी एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात ३ एप्रिलला ईडीने सुप्रीम कोर्टात चौकशीचा सीलबंद अहवाल सादर केला होता. यामध्ये ईडीने युपीए सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले पी. चिदंबरम यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. चिदंबरम यांनी अर्थमंत्रीपदाचा गैरवापर करीत पुत्र कार्ती यांना मदत केल्याचं ईडीने म्हंटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
