अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- काल शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आभासी कार्यक्रमाद्वारे देशातील ४७ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल प्रदान करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी (ता. राहुरी).
जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते;मंगलाराम यांनी अहमदनगर येथे हे सन्मानपत्र स्विकारले.
बिहारमध्ये राजकीय भूकंप, लालूंच्या पक्षाच्या 12 आमदारांचे राजीनामे…
गोपाळवाडी या शाळेत बहुतांश मुले हे भटक्या जमातीचे आहेत. त्या मुलांना शिक्षणात गोडी निर्माण करून वेगवेगळे उपक्रम मंगलाराम यांनी राबविले आहेत. गेल्या १७ वर्षांपासून मंगलाराम हे नवनवीन पद्धतींचा अवलंब करून विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांनी ई-लर्निंग पद्धतीचा अवलंब केला असून, शाळेतील प्रत्येक वर्ग डिजीटल केला आहे. मंगलाराम यांनी सुरु केलेल्या व्हर्चुअल क्लासरूमच्या माध्यमातून या शाळेतील विद्यार्थी हे परदेशातील शिक्षकतज्ज्ञांशी संवाद साधतात.
‘एकनाथ खडसे हे भाजपचे बाहुबली, त्यांना कटप्पाने मारले’: अब्दुल सत्तार
हा पुरस्कार आपल्याला मिळाला असून केलेल्या कामाची पावती मिळाल्याचे नारायण मंगलाराम यांनी सांगितले. ह्या कार्यक्रमाला देशाच्या विविध भागातून सहभागी झालेल्या ४७ शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी विविध श्रेणीमध्ये गौरविण्यात आले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

