औरंगाबाद : एकनाथ खडसे हे शिवसेनेचे बाहुबली नेते आहेत. ते संपणारे नाहीत.ओबीसी समाजाला घेऊन एकनाथ खडसेंनी शिवसेनेत यावं असं उघड आमंत्रण महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल्ल सत्तार यांनी केलं आहे. औरंगाबाद तालुक्यातील पिसादेवी येथील ग्रामपंचायत ईमारतीचे उद्घाटन व विविध विकासकामांचे उद्घाटन मंत्री सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेही उपस्थित होते. खडसे हे भारतीय जनता पक्षाचे बाहुबली होते.
शिवसेना भाजपची तुटलेली युती त्यांनी परत जुळवली. ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. मात्र त्यांच्यावर अन्याय झाला. कटप्पाने बाहुबलीला मारले असाच काही प्रकार एकनाथ खडसे यांच्याबद्दल झाला आहे. ओबीसी समाजाला सोबत घेऊन खडसेंनी शिवसेनेत यावे. शिवसेनेला खडसेंसारख्या अनुभवी नेतृत्वाची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करून आम्ही एकनाथ खडसेंना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करु,असंही मंत्री सत्तार यांनी म्हटलंय.
पारनेरच्या सुनबाई बनल्या लेफ्टनंट कर्नल!
खडसेंची नाराजी दूर करु
‘एकनाथ खडसे हे आमचे जेष्ठ नेते आहेत. राज्यात भाजप वाढवण्यासाठी त्यांच मोठं योगदान आहे. राजकियदृष्ठ्या काही निर्णय घ्यावे लागतात. त्यात कुणी पुढे जाते तर कुणी मागे जाते,एखाद्याला माघार घ्यावी लागली तर ती नाराजी समजू नये. राज्यातील अनेक नेत्यांना प्रसंग पाहून पुढे नेलं जात,खडसेंची नाराजी असेल तर ती एकत्र बसून दुर केली जाईल. अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
राज्य सरकार पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे; लवकरच विमा कवच देण्याबाबत होणार निर्णय : राजेश टोपे
दरम्यान काल एकनाथ खडसेंनी जळगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपवर तोफ डागली होती.माझ्या मुलीला पाडण्यासाठी कुणी प्रयत्न केला. याचे पुरावे मी वरिष्ठांना दिले आहेत. माझा काही गुन्हा असेल तर शिक्षा करा, भ्रष्टाचार केला असेल तर कडक शिक्षा करा, चुक झाली असेल तर सांगा, झोटींग समितीचा अहवाल आल्यानंतरही माझ्यावर अन्याय का? असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. सध्या या षडयंत्रावर मी एक पुस्तक लिहित असून त्यात सर्व बाबी पुराव्यानिशी मांडणार आहे. कोरोना संसर्ग संपल्यानंतर वरिष्ठांना सर्व दाखवेन,तरीही कारवाई झाली नाही तर राजकीय क्षेत्रात पुढील पाऊल उचलण्याबाबत योग्य तो निर्णय घेईन असं एकनाथ खडसे यांनी नमूद केलं.
भाजप आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची लागण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

