Share

बिहारमध्ये राजकीय भूकंप, लालूंच्या पक्षाच्या 12 आमदारांचे राजीनामे…

Published On: 

पटना: आगामी ऐन बिहारची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रीय जनता दलाच्या 12 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. अशा पद्धतीने आमदारांच्या राजीनाम्याने माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांंचा पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. तेजस्वी यादव यांच्यात समन्वयाचा अभाव आणि टिकीट वाटपावरुन नाराजी ही दोन कारणं या आमदारांच्या राजीनाम्याला असल्याची सांगितली जात आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलापुढचं संकट वाढत आहे. ७० दिवसात आरजेडीच्या १२ आमदार आणि एमएलसीने पक्ष सोडला आहे. या सर्व नेत्यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडी-यू) मध्ये प्रवेश केला आहे. तेजस्वी यादव यांच्याच समन्वयाचा अभाव आणि तिकिट न मिळल्याचं कारण देत नेत्यांनी पक्ष सोडला आहे.

पालकमंत्र्यांचा सगळा वेळ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून आपले बगलबच्चे नेमण्याच्या प्रयत्नात गेला- आ. विखे

लालू यादव तब्बल तीन वर्षे तुरूंगात आहेत. पक्षाचे काम फक्त तेजस्वी यादव पाहत आहेत. अशा परिस्थितीत, जुने नेते आणि त्यांच्यात सहज चर्चा होत नाही. इतकेच नव्हे तर अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत तेजस्वी यादव यांचे मतभेद देखील होतात. यामुळेच नाराज झालेले रघुवंश प्रसाद सिंह यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

‘एकनाथ खडसे हे भाजपचे बाहुबली, त्यांना कटप्पाने मारले’: अब्दुल सत्तार

तेजस्वी यांची कार्यशैली अनेक नेत्यांना पटत नाही. बऱ्याच वेळा त्यांची भेट होत नाही. पक्षातील अनेक बड्या नेत्यांनाही त्याचा ठावठिकाणा माहित नाही. दुसरीकडे महाआघाडीतील नेते देखील तेजस्वी यांच्यावर नाराज आहेत.

पारनेरच्या सुनबाई बनल्या लेफ्टनंट कर्नल!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!