अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील जवळपास २५ हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा सगळा वेळ हा ग्रामपंचायतींवर मागच्या दाराने प्रशासक म्हणून आपले बगलबच्चे नेमण्याच्या प्रयत्नात गेला असून, ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा डाव उच्च न्यायालयाने हानून पाडला आहे. अशी टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केली.
आ.विखे म्हणाले की, या सरकारकडे कुठलेही धोरण नाही. तीन तिघाडी व काम बिघाडी असे या सरकारचे काम आहे. पालकमंत्र्यांच्या कागल मध्ये लॉकडाऊन आहे. मात्र, जिल्ह्याचे खासदार अनेक वेळा लॉकडाऊनची मागणी करीत होते. मात्र हे सरकार केवळ प्रशासनाच्या भरवशावर सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
राज्य सरकार पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे; लवकरच विमा कवच देण्याबाबत होणार निर्णय : राजेश टोपे
तसेच जिल्ह्याचे तीन सुपूत्र हे मंत्री आहेत. कोरोनाच्या काळात ते काय करतात, हे त्यांना जिल्ह्यातील लोकांनी विचारले पाहिजेल. हे मंत्री आतापर्यंत कुठेही कोविड सेंटर सुरू करू शकले नाहीत असेही विखे म्हणाले.अहमदनगर महानगरपालिका व पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगरमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
पारनेरच्या सुनबाई बनल्या लेफ्टनंट कर्नल!
कोविड सेंटरचे उद्घाटन माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, वसंत लोढा आदी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर विखे माध्यमांशी बोलत होते.
भाजप आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची लागण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

