Share

महिला शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या योजना ३० टक्के राखीव; कृषीमंत्र्यांची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी सर्व कृषी योजना ३० टक्के आरक्षीत असतील अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी नुकतीच केली आहे. कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी अन्नासह भाजीपाला घरपोहोच दिला. या शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या रहाणाऱ्या महिलांसाठी कृषी विभाग कार्यरत असल्याचेही भुसे यावेळी म्हणाले. ते राज्यस्तरीय महिला किसान दिनानिमित्त आयोजीत धुळे येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

महिला किसान दिनानिमित्त राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा व कृषी महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, आमदार मंजुळा गावित, महापौर प्रदीप कर्पे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर, कृषी विभागाचे सहसंचालक संजीव पडवळ आदी उपस्थित होते.

कृषी योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंब प्रमुखांनी सातबारा उताऱ्यावर महिलांचे नाव लावून घ्यावे. त्यासाठी प्रक्रियाही सुलभ असून आठ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होते. महिला शेतकरी पिकवित असलेल्या शेतमालासाठी स्वतंत्र्य विक्री व्यवस्था उभारण्यात येत आहे. त्यासाठी मोठाल्या शहरांची निवड करण्यात आली आहे. विपणन प्रक्रियेसाठी कृषी विभागाच्या साडेतीनशे अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते दिवाळीपूर्वी शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतील. असे दादा भुसे यावेळी म्हणाले.

याशिवाय महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आतापर्यंत ३१ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २१ हजार कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. महिला शेतकऱ्यांनी कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतानाच स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असेही आवाहन कृषी मंत्री भुसे यांनी यावेळी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!