औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाद्वारे दररोज तीन ते साडेतीन हजार चाचण्या केल्या जात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. लाट ओसरत असली तरी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून विविध पथके व आरोग्य केद्रांतून नित्याने तीन ते साडेतीन हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. तिसरी लाट थोपवण्याचा प्रशासनाचा यामागचा उद्देश आहे.
औरंगाबाद शहरात कोरोनाच्या दुसर्या लाटेने मार्च आणि एप्रिल महिन्यात चांगलेच थैमान घातले होते. त्यावेळी रोजचे हजार ते दीड हजार रुग्ण नव्याने आढळत असल्याने शहरात रुग्णांसाठी बेड्स कमी पडू लागले होते. या परिस्थितीतही प्रशासनाने संयमाने कोरोना चाचण्या वाढवत विविध उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या. परिणामी, मे महिन्यातपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही रुग्ण कमी होण्यास सुरूवात झाली.
मागील महिनाभरात रुग्णसंख्या कमी कमी होत आहे. गेल्या काही दिवसात शहरात दिवसभरात पालिकेची मोबाइल पथके, सिटी एन्ट्री पॉइंट, आरोग्य केंद्रे, प्रशासकीय कार्यालये व विमानतळ आणि रेल्वेस्टेशन या सर्व ठिकाणी तीन हजारावर कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. कोरोनाची संख्या शहरात घटत असली तरी पालिका प्रशासनाकडून खबरदारी म्हणून नियमित प्रतिदिन तीन ते साडेतीन हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. जुलैनंतर आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तिसरी लाट येऊ न देण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण कायम ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत शहरात मृत्युचे प्रमाण अधिक वाढले होते. त्यामुळे रिकव्हरी रेट अर्थातच रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ७८ टक्क्यांपर्यंत खालावले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा चिंतेत पडली होती. मात्र मागील महिनाभरात रुग्णसंख्या कमी होण्याबरोबरच रिकव्हरी रेटमध्येही सुधारणा झाल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. पालिकेच्या अहवालानुसार शहराचा सध्याचा रिकव्हरी रेट ९७.६५ टक्के एवढा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दुर्दैवी घटना! खड्ड्यात साचलेल्या पाण्यात चारचाकी बुडून चौघांचा मृत्यू
- आमदार पेप्सी खायला वेळ देतात पण पोल्ट्री मधील शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही
- सोशल मीडियावर मैत्रीच्या जाळ्यात अडकली पोलीस निरीक्षक, तिघांविरोधात गुन्हा दाखल
- ‘गुंतवणुकदारांची खाती गोठवण्याच्या बातम्या निराधार’ ; अदानी ग्रुप ने दिले स्पष्टीकरण
- कार्यक्रम तोच पण भुमिका नवी; एक तपानंतर सारेगमप ‘पंचरत्न’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
