हिंगोली: जिल्ह्यात सेनगाव जवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. सेनगाव जवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे झालेल्या खड्ड्यात चारचाकी मोटार पडली त्यामुळे पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अशातच सेनगाव येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने तिथे रस्त्याच्या बाजूला एक मोठा खड्डा तयार झाला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात पानी साचले आहे.
चौघेही लोणार येथील असून या पैकी दोघांची ओळख पटली आहे. अंकुश गायकवाड आणि त्र्यंबक थोरवे अशी त्यांची नावे असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हे चौघेही शिक्षक असून ते मुख्यालयी जाण्यासाठी निघाले होते. सेनगाव ते येलदरी मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून रस्त्याच्या बाजूला एक मोठा खड्डा झाला आहे. या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साठले आहे. पाणी साठलेल्या या खड्ड्यात रविवारी मध्यरात्री ही चारचाकी पडली. खड्ड्यात असलेल्या पाण्यात ती उलटल्याने वाहन पूर्णपणे बंद पडले त्यामुळे गाडीमधील कोणालाही बाहेर पडता आले नाही.
वाहन बंद पडल्याने प्रयत्न करूनही कोणाला बाहेर पडता आले नाही त्यामुळे त्यात अडकून चौघांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. खड्ड्यामध्ये या वाहनाचा दिवा दिसल्यामुळे तेथील काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी पाहणी केली असता त्यांना चारचाकी वाहन बुडल्याचे दिसले व त्यात या चौघांचा मृतदेह गावकऱ्यांना दिसला. घाबरून जाऊन गावकऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘आधी दिल्लीची परवानगी घ्या मगच आघाडीचे बोला’, ‘वंचित’चा पटोलेंना टोला
- राज ठाकरे यांचा आज ५३वा वाढदिवस ; ‘या’ ठिकाणी मिळतंय ५३ रुपयांत एक लिटर पेट्रोल
- ‘वडेट्टीवार काम चलावू मंत्री, त्यांना कॅबिनेटमध्येही महत्व नाही’; निलेश राणेंची टीका
- ‘पहिले स्वबळावर आमदार निवडून आणा मग मुख्यमंत्रीपदाचं बोला’, सत्तारांचा पटोलेंना टोला
- ‘शिवसेनेने इटॅलियन विचारधारा स्विकारली यामुळे राम मंदिराला बदमान करण्याची भूमिका’

