औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटून उठले आहे. राज्यभरात संतप्त शिवसैनिक या ना त्या पद्धतीने नारायण राणेंची खिल्ली उडवत आहेत. यात आता औरंगाबादेतील शिवसैनिकही मागे नाहीत. औरंगाबादेत शिवसेना, युवासेना दोन्ही संघटनांद्वारे काल जोरदार आंदोलन करण्यात आले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. तर शहरात कोंबडीचोर या नावाने बॅनरही झळकले. मात्र यात सर्वाधिक चर्चा होत आहे ते आमदार अंबादास दानवे यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओंची.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कानशिलात लगावणार असल्याचे वक्तव्य राणे यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादेत मंगळवारी सकाळी शिवसेनेचे तर दुपारी युवासेनेचे जोरदार आंदोलन झाले. त्यानंतर शहरभर कोंबडीचोर या नावाने मोठमोठे बॅनर ही शिवसैनिकांकडून लावण्यात आले होते. मात्र यात सर्वाधिक चर्चा होती ती आमदार अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओंची. बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेंबद्दल केलेल्या खास वक्तव्याचा व्हिडिओ, तसेच सिंघम चित्रपटातील एक व्हिडीओ यासोबतच नारायण राणे यांना अटक करतांनाचे मिमरद्वारे तयार करण्यात आलेले व्हिडिओ आपल्या फेसबुक वॉलवर त्यांनी शेअर केले आहेत.
या व्हिडिओंवर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर कमेंटची बरसात होत आहे. यात त्यांनी सिंघम चित्रपटातील पोलीस भ्रष्टाचारी मंत्र्याला लाथाबुक्क्यांनी तुडवतांनाचा व्हिडिओ शेअर करत या व्हिडिओचा कोंबडीचोराशी काही संबंध नाही. असल्यास निव्वळ योगायोग समजावा या कॅप्शनसहित व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर मिमर्सद्वारे नारायण राणे यांची खिल्ली उडवला जाणारा व्हिडिओ शेअर करत आता हे कोणी केले असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत राणेंचा कशाप्रकारे समाचार घेतला तो व्हिडिओही शेअर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; ‘या’ रेल्वेतील काही डब्बे पूर्णपणे अनारक्षित होणार!
- भाजपच ठरलं ; मुख्यमंत्र्यांना लिहिणार ‘या’ आशयाचे ७५ हजार पत्र
- दुधाला एफआरपी मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीचे ‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ आंदोलन
- ‘मोदी देशाची संपत्ती नव्हे तर, युवकांची स्वप्ने विकत आहेत’
- भाजपच्या सावेंकडे प्रदेश सरचिटणीस तर घुगे यांच्याकडे चिटणीस पदाची जबाबदारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

