औरंगाबाद : शहराच्या विविध भागातून चोरलेल्या दुचाकी फायनान्स कंपन्यांनी जप्त केल्याची थाप मारून सिल्लोड आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालूक्यात विक्री करणाऱ्या दोघांना सिटी चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटकेत असलेल्या गौसखा कालेखा पठाण (३५, मूळ रा. नाणेगाव, ता. सिल्लोड, ह.मु. ब्रिजवाडी), नवाबखा उस्मानखा पठाण (४०, रा. वडीगोद्री, ता. भोकरदन, जि. जालना) या दोघ संशयितांच्या ताब्यातून पोलिसांनी आणखी १२ दुचाकी जप्त केल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी बुधवारी (ता.२) दिली.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेतील चोरट्यांकडून पोलिसांनी आतापर्यंत जवळपास १४ लाख ५० हजार रूपये किंमतीच्या ३४ दुचाकी जप्त केल्या आहेत. सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहागंज भाजीमंडई, जामा मस्जिद, कॅन्सर हॉस्पीटल पार्किंग, नवाबजानी गल्ली या भागातून मागील एक महिन्यापासून सतत दुचाकी चोरीला जात होत्या. त्यामुळे सिटी चौक ठाण्याच्या विशेष तपास पथकातील पोलिस अंमलदार संजय नंद, संदीप तायडे यांनी शहागंज भाजीमंडई परिसरात सापळा लावला. २४ मे रोजी गौसखा पठाण हा मोबाईल फोनवर बोलण्याचा बहाणा करून बनावट चावीने दुचाकीचे हँडल लॉक उघडण्याचा प्रयत्न करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने नवाब खा पठाण याच्या मदतीने शहागंज भाजी मंडई, जामा मस्जिद, कॅन्सर हॉस्पीटल पार्किंग, घाटी पार्किंगसह विविध भागातून दुचाकी चोरी केली असल्याची कबूली दिली.
पोलिसांनी चोरट्याच्या ताब्यातून १४ लाख ५० हजार रुपये रुपये किंमतीच्या ३४ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. ३४ दुचाकींपैकी १४ दुचाकी चोरीचे गुन्हे हे एकट्या सिटीचौक पोलीस ठाण्याचे असल्याचे समोर आले. ही कारवाई पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त हनुमंत भापकर, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक काशिनाथ महांडुळे, पोलिस अंमलदार खैरनार, संजय नंद, संदीप तायडे, शेख, माजिद पटेल, संतोष संकपाळ, गायकवाड आदींच्या पथकाने चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काशिनाथ महांडुळे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राऊतांच ‘ते’ आमंत्रण आम्ही स्वीकारतो; आशिष शेलारांच्या विधानाने उत्सुकता वाढली
- ऱ्हदयद्रावक! मायलेकीसह पुतणीचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
- अजब ! 5G याचिकेवरील सुनावणीवेळी जुही चावला लागल्या गाणी गायला, कामकाजात आणले व्यत्यय
- एकच धून…६ जून ! शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य होण्यासाठी संभाजीराजेंनी जाहीर केली लिंक
- ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ तीन मोठे निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

