Share

विजय मिळताचं पंतप्रधान मोदी निघाले परदेशवारीला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेसचा राज्यासह देशात दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान बनणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

३० मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीनंतर मोदी पुन्हा एकदा परदेश दौऱ्यांसाठी सज्ज झाले आहेत. शपथविधी होण्यापूर्वीचं मोदींचा परदेश दौऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सर्वप्रथम १४-१५ जूनदरम्यान शांघाय सहकार संघटनेच्या किर्गीस्तान येथे होणाऱ्या शिखर परिषदेला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर २८-२९ जून दरम्यान जपानमधील ओसाका येथे होणाऱ्या जी २० शिखर परिषदेला हजर राहणार आहेत.

शांघाय सहकार संघठनेच्या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान उपस्थित राहणार आहेत तर जी २० शिखर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे उपस्थित राहणार आहेत. यानंतर मोदी जूलै किंवा ऑगस्टमध्ये चीनच्या राष्ट्रपतींना भेटणार आहेत. तसेच फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्यूल मँक्रो यांनी मोदींना ऑगस्टमध्ये होणाऱ्या शिखर संमेलनाचे निमंत्रण दिले आहे.

त्यानंतर सप्टेंबरमध्ये मोदी रशियाला जाणार आहेत तेथे वलादिवोस्टकमध्ये होणाऱ्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये ते सह्बागी होणार आहेत. ४ नोव्हेंबरला बँकॉकमध्ये होणाऱ्या ईस्ट-एशिया समिट आणि ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला ११ ते १३ नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अशा पद्धतीचे मोदींच्या परदेश दौऱ्यांचे एकूण वेळापत्रक असणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!