Share

चालु सामन्यात रोहित गोलंदाजाला धडे देताना व्हिडिओ व्हायरल

Published On: 

चेन्नई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखुन दणदणीत पराभव केला. सलग तीन पराभव स्विकारल्यानंतर पंजाबने हा विजय मिळवला आहे. तर मुंबईचा हा सलग दुसरा तर स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला आहे. शानदार अर्धशतकासाठी पंजाब संघाचा कर्णधार के एल राहुल याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई संघाला पुन्हा एकदा मधल्या फळीतील फलंदाजाच्या अपयशामुळे निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून केवळ १३१ धावा करता आल्या. मात्र चेन्नईच्या खेळपट्टीवरील मागील काही सामन्यातील निकाल पाहता. रोहितने दुसऱ्या डावात आपले कसब पणाला लावले. यावेळी रोहित हा जयंत यादवला गोलंदाजीबाबत धडे देताना आढळला. रोहित बोलत असताना त्याचा आवाज यष्टीच्या माइकमध्ये रेकॉर्ड झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

https://twitter.com/CricketUnlimi/status/1385646766104596480

क्रिस गेलसमोर जयंत गोलंदाजी करत असताना ही घटना घडली. जयंत गोलंदाजी साठी आल्यावर तेव्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितने जयंतला चेंडू कोरडा आहे. त्यामुळे चेंडू उंच उडाला, तर फलंदाजाला खेळण्यास अवघड जाईल असे सांगितले. त्याचा हा आवाज यष्टिच्या माइकमध्ये कैद झाला आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या सामन्यात पंजाबने मुंबईवर ९ गडी राखून विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!