Share

आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्ध शतक झळकावुनही ‘या’ खेळाडूसाठी भारतीय संघाची दारे बंदच

Published On: 

मुंबई : आयपीएल स्पर्धा सुरु होऊन दहा दिवसापेक्षाही जास्त कालावधी लोटला आहे. आयपीएल स्पर्धेत अनेक भारतीय युवा खेळाडूंनी विशेष चमक दाखवत भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले. मात्र काही खेळाडू चांगली कामगिरी करुनही त्यांच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे कधीच उघडले नाही.

असा एक खेळाडु होता पॉल वॉल्थटी. पॉल हा आयपीएल मध्ये पंजाब संघाकडून खेळत होता. २०११ च्या आयपीएल स्पर्धेत पॉलने मोहाली येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ६३ चेंडुत नाबाद १२० धावा फटकावल्या होत्या. यात पॉलने २ षटकार आणि १९ चौकारांची आतीषबाजी केली होती. पॉलीने आयपीएलमध्ये २००९ ते २०१३ या कालावधीत पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांकडुन खेळला. पॉलने आयपीएलमध्ये २३ सामन्यात ५०५ धावा केल्या होत्या. यात १ शतक आणि २ अर्धशतकांचाही समावेश होता.

महत्वाची बाब म्हणजे पॉल हा एकमेव खेळाडू आहे. ज्याने आयपीएल मध्ये शतक केल्यानंतरही त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. आयपीएलच्या इतिहासात एकूण १८ भारतीय खेळाडूंनी शतके केली आहेत. आयपीएलमध्ये सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाती रायडू, सुरेश रैना, ऋद्धिमान साहा, यूसुफ पठान, मुरली विजय, केएल राहुल, मयंक अग्रवाल, मनीष पांडे, संजू सॅमसन, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, शिखर धवन या खेळाडुंनी शतक ठोकले आहे. या यादीत आता देवदत्त पडीक्कलचे नाव जोडले गेले त्यानेही अद्याप आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले नाही.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!