Share

गोपीनाथ गडाचे दर्शन घेवून डॉ. भागवत कराड यांच्या ‘जनआर्शिवाद’ यात्रेला सुरूवात

Published On: 

बीड : केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर भाजपचे नेते डॉ. भागवत कराड यांच्या जनआर्शिवाद यात्रेला बीड जिल्ह्यातील परळी इथून सुरुवात झाली आहे. बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलून डॉ. कराड यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज होत्या. अखेर वरीष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी या जनआर्शिवाद यात्रेला उपस्थिती लावली. या यात्रेचा शुभारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

पंकजा मुंडे यांनी उभारलेल्या गोपीनाथ गडावर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस अभिवादन करुन या यात्रेला सुरूवात झाली. बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद अशा लोकसभा मतदार संघातून ही यात्रा जाणार आहे. यात्रेचा समारोप औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात होणार आहे. या माध्यमातून मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात नव्याने सहभागी झालेल्या मंत्र्यांच्या माध्यमातून या जनआर्शिवाद यात्रा काढण्यात येत आहे. डॉ. भागवत कराड यांच्या रुपाने ओबीसी नेतृत्त्व देण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मात्र, ओबीसी चेहरा असलेल्या पंकजा मुंडे यामुळे नाराज झाल्या आहेत. त्यामुळे कराड यांना किती सहकार्य मिळेल, या बाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!