🕒 1 min read
मुंबई : आर्यलँडच्या दौऱ्यावर असलेल्या दक्षिण अफ्रिका संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. आर्यलॅंडने दिलेल्या २९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेच्या संघाला केवळ २४७ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह आर्यंलॅंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
आर्यलॅँडने दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या या धक्कादायक विजयानंतर आयसीसीच्या क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणातालीकेत भारतीय संघाला फटका बसला आहे. या गुणतालीकेत भारतीय संघ २९ गुणासंह नवव्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध विजय मिळवल्याने आर्यलँडचा संघ पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आर्यलँडच्या नावे ३५ गुण आहेत.
या गुणतालीकेत इंग्लंडचा संघ ९५ गुणासंह अव्वल स्थानी विराजमान आहे. या गुणतालीकेतील अव्वल ८ संघ हे आगामी २०२३ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरेल. मात्र गुणतालीकेचा फटका भारतीय संघाला बसणार नाही. कारण ही स्पर्धा भारतात आयोजीत होणार असल्याने टीम इंडियाला स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “२०१४ प्रमाणे पुन्हा धोका मिळू नये यासाठीच….,” पटोलेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचले
- करन्सी नोट प्रेसमधील 5 लाख चोरी प्रकरण, नाशिक पोलिसांच्या तपासाला सुरवात
- झोटिंग समितीची खडसेंना क्लीन चिट नव्हती, मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप?
- ‘संजय राऊत यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं आणि तेच अग्रलेखात लिहिलं’
- झोटिंग समितीचा गायब अहवाल सापडला, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
