Share

बंगालच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी केलं ममतादीदींच अभिनंदन; दिलं ‘हे’ आश्वासन !

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : देशात कोरोना संकट वाढत असतानाच केरळ, पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या निवडणूक पार पडल्या होत्या. यानंतर, आज मतमोजणी पार पडत असून निकाल जाहीर होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे दिग्गज नेते मैदानात उतरले होते.

दरम्यान, आता निकाल जाहीर होत असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यांनी कडवी लढत दिली आहे. यामुळे भाजपने मागील निवडणुकांपेक्षा मोठी मुसंडी मारली असली तरी दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. तर, आतापर्यंत तृणमूल काँग्रेसने २०० हुन अधिक जागांवर विजय मिळवला असून पक्ष २२३ हुन अधिक जागांवर विजय मिळवेल असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

बंगालमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर टीका होत असतानाच मोदींनी ट्विटद्वारे ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. ‘तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगालमधील विजयासाठी ममतादीदींचं अभिनंदन ! लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि कोविड-१९ रोगाच्या साथीवर विजय मिळवण्यासाठी केंद्र सरकार पश्चिम बंगाल सर्वतोपरी मदत करणे सुरूच ठेवेल,’ असं आश्वासन देखील मोदींनी ममता बॅनर्जी यांना दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!