Share

विजयानंतर सामनावीर जयदेव उडानकटने शेअर केला त्याचा सक्सेस मंत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात आखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारत दिल्ली कॅपीटल संघाचा ३ गडी राखुन पराभव केला. दिल्लीने कर्णधार पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानसमोर १४८ धावांचे लक्ष्य ठेवले. दोन चेंडु बाकी असताना ७ गडी गमावुन राजस्थानने विजय साकारत गुणतालीकेत आपले खाते उघडले.

सामन्यानंतर बोलताना उडानकटने त्याच्या चांगल्या कामगिरीचे रहस्य सांगताना म्हणाला की ‘ नवीन चेंडुने स्वतंत्र्यपणे गोलंदाजी मागील हंगामात करणे मला शक्य झाले नाही. मात्र या हंगामात मला ते स्वातंत्र्य मिळाले. आजच्या सामन्यात खेळपट्टीवर ओलावा जाणवत होता, ज्याचा आम्ही पुरेपुर वापर केला. संपूर्ण खेळ कठीण लेंथवर हिट करण्याचा होता. आज मिळालेल्या संधीचे मी सोने केले.’ असे जयदेव उडानकट म्हणाला.

या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीला फलंदाजीसाठी पाचारण केले. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीवीरानी शतकी सलामी देणाऱ्या धवन-शॉ या जोडीला जयदेव उडाकटने स्वस्तात तंबुत माघारी पाठवत राजस्थानला चांगली सुरुवात करुन दिली होती. या सामन्यात जयदेव उडानकटने ४ षटकात केवळ १५ धावा देत महत्वाचे ३ गडी बाद केले. या कामगीरीमुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!