जालना: जिल्ह्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे काही दुर्दैवी घटना घडताना दिसत आहेत. अशीच एक घटना जालना येथे घडली. जिल्हा रुग्णालयात दाखल गंभीर कोरोना रुग्णाचा सीटी स्कॅन स्कोअर २१ असल्यामुळे आयसीयूत उपचार सुरू असताना ड्यूटीवरील डॉक्टरांनी रुग्णास परस्पर जनरल वाॅर्डात शिफ्ट केले. त्यानंतर अवघ्या १८ तासांत रुग्ण दगावला. त्यानंतरही मृत्यूची माहिती नातेवाइकांना न कळवताच मृतदेह शवविच्छेदनगृहात नेऊन टाकला.
यामुळे संतप्त नातेवाइकांनी थेट कोविड हॉस्पिटलबाहेर आक्रोश करत ठिय्या मांडला व निष्काळजीपणाचा आराेप करत डॉक्टर, नर्सेस व आरएमओवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या दालनात जाऊन दोषींना निलंबित करण्यासाठी टाहो फोडला. तब्बल आठ तासांनंतर डॉ. भोसले यांनी चौकशीअंती कारवाईचे आश्वासन दिल्यावर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधीसाठी नेला.
बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी येथील ४० वर्षीय रुग्णास नातेवाइकांनी १३ एप्रिल रोजी शहरातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी डाॅक्टरांनी रुग्णाचे सीटी स्कॅन करून आणण्याचे सांगितले. यानुसार सीटी स्कॅन करून रिपोर्ट डॉक्टरला दाखवल्यावर रुग्णाची प्रकृती अत्यंत खालावलेली असून स्कोअर २१ असल्याने आयसीयूत भरती करावे लागेल. याला खर्चही मोठा येईल यामुळे रुग्णास शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला.
- महाराष्ट्र ठरणार लस निर्मिती करणार पहिलं राज्य; हाफकिन संस्थेला केंद्राकडून परवानगी
- ‘खंडण्या गोळा करायला जशी यंत्रणा कामाला लावली, तशी आरोग्य यंत्रणा कामाला लावली असती तर…’
- भाजपचा आमदार फुटून पोटनिवडणूक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये; जयंत पाटलांच सूचक विधान
- अजित पवारांच्या सभेत स्टेजवर हजेरी लावणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे कोरोनाने निधन !
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

