🕒 1 min read
पंढरपूर : २०१९ विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काही मतभेदांमुळे शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं आहे. यानंतर सर्वाधिक जागा मिळून देखील भाजपला विरोधी बाकावर बसावं लागल्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजपने घेतली आहे.
दरम्यान, शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतल्यानंतर शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर देखील भाजपने प्रश्न निर्माण करत ही बाळासाहेबांची शिवसेना नसल्याची टीका करण्यात येत आहे. आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक फोटो शेअर करून शिवसेनेला डिवचलं आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सैनिकांची काय ही दशा? कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाच्या पायावर कुणाचे डोके? #लाचारी#कुठं_गेला_आत्मसम्मान#बिघाडी_सरकार pic.twitter.com/y6cYlRQeMZ
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) April 16, 2021
या फोटोमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या कार्यालयाला भेट दिल्याचं दिसून येत असून बाकी सर्व नेते हे खाली तर पवार हे खुर्चीवर बसल्याचे दिसून येत आहे.’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सैनिकांची काय ही दशा? कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाच्या पायावर कुणाचे डोके?’ अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
- नागरिकांशी संवेदनशीलपणे वागा; गृहमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना
- कोहली-रोहितच्या पगारामध्ये वाढ नाही मात्र, हार्दिक पांड्याचे प्रमोशन
- भाजपचा आमदार फुटून पोटनिवडणूक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये; जयंत पाटलांच सूचक विधान
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज देऊन मदत करा; वडेट्टीवारांच मुख्यमंत्र्यांना पत्र


