🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री करिना कपूर नेहमीच अपल्या सोशल मीडीयाद्वारे चर्चेत आसते. तिच्या फॅशन सेन्समुळे तिचे चाहते घायाळ होतात. करिना कपूर ही कपूर खानदानाची कन्या असून पतौडी कुटूंबाची सुन आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपली सासु शर्मिला टागोर यांच्याबद्दल एक नवा खुलासा केला आहे.
करिनाने या मुलाखतीत शर्मिला टागोर यांच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. शर्मिला टागोर या बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रीपैकी एक असल्याचे बेबोने म्हणले आहे. या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली की तिला तिच्या सासु शर्मिला टागोर यांची खुप भीती वाटते. जर त्यांना काही सांगायचे असेल तर मला भीती वाटते.
तिचा हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’ या शोमधील आहे. या व्हिडीओत करिनाने सासुचे कौतुक करताना म्हणाली आहे की, त्याच्यांसारखी सासु मिळाली हे माझे भाग्य आहे. त्या मुलांची आणि नातवंडासह सुनाची सारखीच काळजी घेतात. त्याच्यांसोबत वेळ घालवायला घरातील प्रत्येक सदस्य उत्सुक असतो. करिनाने काही दिवसापुर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. करिना लवकरच आमिर खानच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती करण जोहरच्या तख्त चित्रपटातही दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- आम्ही राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना वर्चस्व गाजवण्याची संधी दिली : रिषभ पंत
- खबरदारीचा उपाय! ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून जालन्यात ४ प्लांट सील
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- कोहली-रोहितच्या पगारामध्ये वाढ नाही मात्र, हार्दिक पांड्याचे प्रमोशन
- पृथ्वी शॉला बीसीसीआयचा मोठा दणका; ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगीरी भोवली


