वेदांता लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील दिग्गज फॉक्सकॉन यांनी गुजरातमध्ये अर्धसंवाहक प्रकल्प आणि डिस्प्ले FAB उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केला. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. मात्र प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केल्यानंतर वेदांता गृपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वेदांता लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील दिग्गज फॉक्सकॉन यांनी गुजरातमध्ये अर्धसंवाहक प्रकल्प आणि डिस्प्ले एफएबी उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.वेदांता या प्रकल्पात १,५४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गांधीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या प्रकल्प बद्दल वेदांताच्या अध्यक्षांनी ट्विट करून दिली माहिती-
वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘ऐतिहासिक प्रसंग. नवीन वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. कंपनीची ₹1.54 लाख कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक भारताची स्वावलंबी सिलिकॉन व्हॅली प्रत्यक्षात आणण्यास मदत करेल.
History gets made! ???????? Happy to announce that the new Vedanta-Foxconn semiconductor plant will be set up in #Gujarat. Vedanta’s landmark investment of ₹1.54 lakh crores will help make India's #Atmanirbhar Silicon Valley a reality. (1/4)
— Anil Agarwal (@AnilAgarwal_Ved) September 13, 2022
या प्रकल्पामुळे लाख लोकांना मिळेल रोजगार-
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी यावेळी सांगितले की, दोन्ही कंपन्या गुजरातमध्ये हा प्लांट उभारण्यासाठी १,५४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. या सुविधेमुळे एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यावेळी बोलताना ते म्हणाले, “हा प्रकल्प पंतप्रधान मोदींच्या भारतात एक मजबूत उत्पादन आधार तयार करण्याच्या दृष्टीकोनाची पूर्तता करण्यास मदत करेल. यामुळे आमची इलेक्ट्रॉनिक्स आयात कमी होईल आणि आमच्या लोकांना एक लाख थेट कुशल रोजगार उपलब्ध होईल. यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे पटेल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Sandeep Deshpande | “बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची क्षमता फक्त राज ठाकरेंमध्ये आहे”
- Congress | गोव्यामध्ये काँग्रेसचे आठ आमदार फुटले, भाजपमध्ये करणार प्रवेश
- Brahmastra Box Office Collection Day 5 | ‘ब्रह्मास्त्र’ ने 5 दिवसात 150 कोटींचा टप्पा पार केला..
- Vedanta Foxcon | महाराष्ट्राचा वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला का गेला? जाणून घ्या
- Mission Lotus | महाराष्ट्रनंतर गोवामध्ये भाजपचं मिशन लोटस, काँग्रेसला पडणार मोठं खिंडार
- Jitendra Awhad | “ठेवू नका महाराष्ट्र गुजरातला गहाण, तुम्हाला…” ; वेदांता-फॉक्सकॉन कंपनीवरुन जितेंद्र आव्हाडांचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

