Share

शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर कार्यकर्ते आक्रमक, राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक

Published On: 

🕒 1 min read

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाला, असा आरोप शिंदे समर्थकांनी करत राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दगडफेक केली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी जावळी सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशीकांत शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जावळतील कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांच्यात लढत झाली. यात शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. यामुळे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट पक्ष कार्यालयावरच हल्ला चढवला आहे. शिंदे समर्थकांना पक्ष कार्यालयावर दगडफेक करत राग व्यक्त केला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पक्षश्रेष्टी स्थनिक नेत्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले,  मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन, ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभं केलं, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका, ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो, पवारसाहेब, अजितदादा, सुप्रिया ताई यांची माफी मागतो, भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्त्या आहे हे पवार साहेबांना माहिती आहे, एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन.

मी एका मताने पराभूत झालो, तो स्वीकारतो, माझ्यासाठी पवारसाहेब, अजितदादा यांनी प्रयत्न केले. माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!