मुंबई : लॉर्ड्स कसोटीतील दैदीप्यमान विजयानंतर लीड्स कसोटीत भारताला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ३५४ धावांच्या आघाडीसमोर टीम इंडियाचा दुसरा डाव २७८ धावांवर अटोपला. यासह इंग्लंडने भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकत मालिका १-१ अशी बरोबरी केली आहे.
लीड्स कसोटीतील पराभवानंतर काही वेळातच भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलु खेळाडू रविंद्र जडेजाला सामना संपल्यनंतर रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे.
रविंद्र जडेजाने सोशल मीडीयावर पोस्ट करुन याबद्दल माहिती दिली आहे. लीड्स कसोटीत भारतीय संघाला एक डाव आणि ७६ धावांनी लाजीरवाना पराभव स्विकारावा लागला आहे. चौथ्याच दिवशी इंग्लंडने भारतीय संघाला नमवले. सामन्याच्या पहिल्या डावात अवघ्या ७८ धावात भारतीय संघाचा डाव गडगडला. याविजयासह इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादकरांनो सावधान; शहरातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ
- देशात महाराष्ट्र अग्रेसर ; कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या गेली दीड कोटीवर
- ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांवर विजय वडेट्टीवार संतापले, म्हणाले..
- ..तर पोलिसांनी भाजपा नेत्यांचे मुसक्या आवळाव्यात, कुठलीही दया दाखवू नये-सचिन सावंत
- ‘नेत्यांना पक्षात घेऊन वापरायचे, हेच भाजपचे धोरण’, जयंत पाटलांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

