टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरच्या सीमेवर दहशतवाद्यां विरुद्ध लढताना भारताचा सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले होते. मेजर कौस्तुभ राणे यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. मात्र मेजर कौस्तुभ राणे यांच्या मागे त्यांच्या पत्नीने देखील खचून न जाता देश सेवेचा विडा उचलला आहे. तर मेजर कौस्तुभ राणे यांची पत्नी कनिका रावराणे यांनी लष्कर आधिकारी पदाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. ऑक्टोबर महिन्यात चेन्नई येथे कनिका राणे लष्करी प्रशिक्षण घेणार आहेत.
७ ऑगस्ट २०१८ रोजी जम्मू-काश्मीरच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. त्यावेळी भारतीय जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोन दहशदवाद्यांचा खात्मा केला या चकमकीवेळी भारताच्या चार जवानांना वीरमरण आले होते. शहिदांमध्ये के.पी मेजर कौस्तुभ राणे आणि तीन जवानांचा समावेश होता.
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीने मात्र खचून न जाता पतीचे अर्धवट स्वप्न पूर्ण करण्याचा आणि या देशाप्रती आपले कर्तव्य बजावण्यासाठी लष्करात भारती होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ घेतला नसून त्या दृष्टीने वाटचाल देखील केली आहे. तर या केलेल्या निश्चयाची पहिली पायरी देखील यशस्वीरीत्या पाडली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

