मुंबई : आयपीएल २०१३ मध्ये झालेल्या स्पॉट फिक्सींग प्रकरणातील भारतीय संघाचा माजी गोलंदाज श्रीसंतची बंदी काही दिवसापुर्वी हटवीण्यात आली. यानंतर श्रीसंतने मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मुश्ताक अली स्पर्धेत पुनरागमन केले होते. या स्पर्धेत तो केरळ संघाकडुन खेळत होता.
श्रीसंतनतर याच प्रकरणातील दोषी मुंबईचा खेळाडू अंकित चव्हाणची बंदी हटवली असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. अंकितने स्वत: याचा खुलासा केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे लोकपाल डीके जैन यांनीही आपली शिक्षा कमी करून ७ वर्षे केली असा दावा अंकित चव्हाणने केला आहे. मात्र अद्यापही यासंदर्भात बीसीसीआयकडून अधिकृत पत्र अंकितला मिळाले नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना अंकित म्हणाला की, ‘लोकपाल जैन महिनाभरापूर्वी ३ मे रोजी हा निर्णय दिला होता. यामुळे माझ्यावर लागु असलेली बंदी सप्टेंबर २०२० मध्येच संपली आहे.’
या संदर्भात अंकितने बीसीसीआयला पत्र लिहीले असल्याचेही सांगितले आहे. मात्र अद्यापही बीसीसीआयने काहीच उत्तर न दिल्यामुळे त्याने एमसीएकडे मदत मागीतली. येत्या ११ जुन रोजी मुंबई क्रिकेट असोसीएशन म्हणजे एमसीएची बैठक होणार आहे. या बैठकीत हा विषय मांडला जाण्याची शक्यता आहे. २०१३ आयपीएल हगांमात स्पॉट फिक्सींग प्रकरणी बीसीसीआयने एस श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या तीन खेळाडूंवर आजीवन बंदी घातली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- मोर्चासाठी जाणाऱ्या मराठा आंदोलकांना जिल्ह्याभरात केले स्थानबद्ध
- ‘शिवराज्याभिषेक दिनी राज्यभरातील सर्व महाविद्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा करणार’
- अवघ्या चार तासात औरंगाबाद पोलिसांनी शोधला उपजिल्हाधिकाऱ्यांचा कुत्रा
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- प्राध्यापकांना ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने द्या-आ.विक्रम काळे यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

