औरंगाबाद : पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घनश्याम सोनवणे नेहमीच वेगवेगळ्या प्रकरणाचा तपास लावण्यात चर्चिले जातात. त्यातच आता त्यांनी उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे यांचा लॅब्रो डाॅग (LUFFY) लुफी याचा अवघ्या चार तासांत शोध घेतला. तसेच लुफीला सुखरुप सुत्रावे परिवाराच्या स्वाधिन केले.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, सहकार नगर एन-५, सिडको येथून सरिता सुत्रावे यांचा लॅब्रो डॉग शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता चानकपणे गायब झाला होता. त्यांनी ताबडतोब सिडको पोलीस स्टेशनला जावुन रितसर तक्रार दाखल केली. तसेच घरी आल्यावर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात तिघांनी लुफीला मोटासायकवर घेवून गेल्याचे दिसून आले. रात्रभर सुत्रावे परिवाराने लुफीची प्रतिक्षा केली. मात्र, तो मिळून आला नाही.
दुसऱ्या दिवशी सकळीच त्यांनी घनश्याम सोनवणे यांच्याशी संपर्क करुन त्यांना सविस्तर माहिती दिली. सोनवणे यांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेवून शोध सुरू केला. आणि अवघ्या चार तासाच लुफीचा शोध लावला. लुफीला सुखरुप पाहताच सुत्रावे परिवाराच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. लुफीला सुत्रावे परिवारास स्वाधीन करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- प्राध्यापकांना ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने द्या-आ.विक्रम काळे यांची मागणी
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार
- उस्मानाबाद शहरात बालविवाह थांबवण्यात महिला आणि बालविकास विभागाला यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

