मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमिपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करुन राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये हा दिन साजरा करण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे सरकारच्या आणखी एका मोठ्या निर्णयाची माहिती दिली आहे. रविवारी साजरा होणारा शिवराज्याभिषेक दिन राज्यभरातील सर्व महाविद्यालयांमद्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. तर पुढील वर्षीपासून शिवज्योत रॅली काढली जाणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केलीय.
त्याचा शुभारंभ उद्या पुण्यातील COEP महाविद्यालयात केला जाणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं. राज्यभरातील महाविद्यालये आणि खासगी वीद्यापीठातही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याबाबतचा अध्यादेश महाविकास आघाडी सरकारने काढला आहे. त्याची एक प्रत खासदार संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार
- उस्मानाबाद शहरात बालविवाह थांबवण्यात महिला आणि बालविकास विभागाला यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

