Share

प्राध्यापकांना ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने द्या-आ.विक्रम काळे यांची मागणी

Published On: 

औरंगाबाद : प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने देण्याची मागणी मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी केली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांनी प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. या वेळी सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली आहे.

यामध्ये विक्रम काळे यांनी केलेल्या मागणीनुसार सातव्या वेतन आयोगाची केंद्र सरकारकडून आलेली ५० टक्के हिस्यांची १३२९ कोटी ९३ लाखांची रक्कम जशीच्या तशी रोखीने प्राध्यापकांना देण्यात यावी. त्याचे दोन भाग करु नयेत तसेच ती रक्कम जीपीएफमध्ये टाकू नये अशी मागणीही आमदार काळे यांनी केली आहे. या संदर्भात २० मे रोजी घेतलेला शासन निर्णय रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या बरोबरच नॉन कॉलिफाईड तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना वेतन अदा करावे. ज्या ठिकाणी नेट-सेट उमेदवार मिळत नसतील तेथे तासिका तत्त्वावर नियुक्ती देवून दरमहा मानधन अदा करावे अशी मागणीही आमदार काळे यांनी केली आहे. बिगर नेट–सेट प्राध्यापकांचा प्रश्न लवकर मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मंत्र्यानी दिले असल्याची माहितीही आमदार काळे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!