औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात विविध मराठा संघटनांकडुन मोर्चे,उपोषण,आंदोलनाची मोट बांधली जात आहे. शनिवारी म्हणजेच ५ जुन रोजी बिड येथे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात येणार होता. तसेच ६ जुन रोजी रायगड येथे शिव राज्यभिषेक दिनानिमीत्त अभिवादन करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा, स्वाभिमानी छावा मराठा संघटना आणि अन्य सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जाणार होते. या अनुषंगाने पोलिसांनी जिल्हाभरातील मराठा आंदोलकांना स्थानबद्ध केले होते.
यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक तथा स्वाभिमानी छावा मराठा संघटनेचे प्रदेश सचिव किरण काळे पाटील, मराठा क्रांती मोर्चिचे समन्वयक तथा स्वाभिमानी छावा मराठा संघटनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मनोज मुरदारे, आप्पासाहेब जाधव, धनंजय चिरेकर, गणेश कळसकर, अभिजीत लोणकर, विजय शेळके, शिवसंग्रामचे युवक शहराध्यक्ष बालासाहेब भगनुरे, राम भगुरे, भागवत भुमरे, नागेश दांडाईत, वरद जोगस, संजय सावंत, सुरज चक्रनारायण, रवी राठोड, विशाल हिवाळे आदींना ताब्यात घेतले होते.
आंदोलकांना ताब्यात घेतल्यामुळे मराठा कार्यकर्ते नाराज झाले असुन पोलीसांनी कितीही वेळा अटक करून मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्यभरात आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा समन्वयक किरण काळे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार
- उस्मानाबाद शहरात बालविवाह थांबवण्यात महिला आणि बालविकास विभागाला यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

