पुणे : जॉनी बेअरस्टोचा शतकी अन् जेसन रॉयच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाहुण्या इंग्लंडने भारताचा 6 गडी व 39 चेंडू राखून धुव्वा उडवला. कुलदीप यादव व कृणाल पांडय़ा या फिरकी गोलंदाजांचे अपयश हिंदुस्थानच्या पराभवाला कारणीभूत ठरले. या विजयामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात के.एल.राहुलने महत्वाची भूमिका बजावली आक्रमक बॅट्समन के.एल.राहुलची बॅट चांगलीच बोलली. त्याच्या बॅटने टीकाकारांची बोलती बंद केली. राहुलने 114 चेंडूत 108 धावांची खेळी करताना 7 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार लगावले. यादरम्यान शानदार शतक झळकावल्यानंतर राहुलने त्याच्या अंदाजात सेलिब्रेशनही केलं.
राहुलने पहिल्यांदा दोन्ही डाळे झाकले आणि त्यानंतर दोन्ही हातांची बोटे कानाजवळ नेली. एकंदरिच त्याच्या या कृतीतून त्याला काहीतरी संदेश द्यायचा आहे, हे भारतीय क्रिकेट फॅन्सला कळालं नाही. पण सामना संपल्यानंतर के.एल. राहुलने त्याची कृती समजावून सांगितली.
“माझं सेलिब्रेशन हे बाहेर उठलेल्या आवाजाला शांत करण्यासाठी होतं. याचा अर्थ असा नाही की मला त्यांना अपमानित करायचं होतं. काही लोक तुम्हाला अनेकदा पाण्यात बघत असतात. बहुदा त्यांच्यावर लक्ष देण्याची गरज नसते. यासाठीच बाहेरच्या आवाजाला शांत करण्यासाठी माझं सेलिब्रेशन होतं,” अशी राज की बात के.एल. राहुलने सांगितली.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाची दुसरी लाट जास्त खतरनाक, २५ लाखांहून अधिक लोक कोरोना संक्रमित होण्याची शक्यता
- जाणून घ्या ! कच्चा आंबा खाण्याचे फायदे
- ‘जर संपूर्ण भारत बांगलादेशची निर्मिती व्हावी या बाजूने होता तर आंदोलनाची गरज काय होती?’
- ‘आपले पंतप्रधान बांग्लादेशला ‘फेक न्यूजचा’ आस्वाद देत आहेत, सर्वांना माहित आहे बांग्लादेशला कोणी मुक्त केले’
- ‘मी तर फक्त कव्हरिंग लेटर दिले रश्मी शुक्ला यांचा अहवाल तर नवाब मालिकांनी खुला केला’


