Share

सलमान, संजय दत्त, रिया नंतर आता शाहरुखच्या मुलाची केस लढणार सतीश मानशिंदे

Published On: 

मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. एनसीबीने याठिकाणाहून अंमली पदार्थांचा साठाही जप्त केला होता. त्यानंतर एनसीबीने आर्यनची कसून चौकशी केल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर अटक झाली आहे. त्याच्यासोबत इतर दोघांना एनसीबीने अटक केली आली. त्यामुळे शाहरुखच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

अटकेनंतर एनसीबी अधिकाऱ्याने आर्यनला मुंबईच्या जे जे रुग्णालयात मेडिकलसाठी घेऊन गेले होते. तिथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान मुलाच्या अटकेनंतर शाहरूख खानने केसची जबाबदारी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांच्यावर सोपवली आहे. बॉलिवूडमधील  हायप्रोफाईल केस म्हटलं की पाहिलं नाव सतीश मानशिंदेंच येतं.

कोण आहेत मानशिंदें?

सतीश मनेशिंदे हे मूळचे धारवाडचे रहिवासी आहेत.  सतीश मानशिंदे मुंबईत लॉ ग्रॅजुएट फ्रेशर म्हणूनआले होते. ते 1983मध्ये नोकरीच्या शोधात होते. त्यावेळी त्यांनी सुप्रसिद्ध क्रिमीनल लॉयर राम जेठमलानी यांच्याकडे नोकरीला सुरूवात केली. मानशिंदेंनी जेठमलानी यांच्या अंतर्गत कनिष्ठ वकिल म्हणून कार्यरत असताना त्यांनी 10 वर्ष दिवाणी आणि गुन्हेगारी कायद्याची प्रॅक्टीस केली. यात त्यांनी दिग्गज नेते, अभिनेत्यांकडून केस लढवल्या.

बॉलिवूडमध्ये सतीश मानशिंदेंचं मोठं नाव आहे. हे तेच वकील आहेत ज्यांनी याआधी संजय दत्त, सलमान खान आणि नुकतीच रिया चक्रवर्तीचीही केस लढवली होती. सलमान खानच्या काळवीट हत्या प्रकरणात ते सलमानचे वकील होते. तर 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांनी संजय दत्तची बाजू लढवली होती. तर नुकत्याच गाजलेल्या सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्यांनी सुशांतची मैत्रिण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीची केसही लढवली होती.

विश्वासू सेलिब्रिटी वकील म्हणून ओळखले जाणारे मानशिंदेची फिची रक्कमही फार मोठी आहे. मिळालेल्या माहितीनुसार सतीश मानशिंदेंची एका दिवसाची फी तब्बल 10 लाख रूपये इतकी आहे. यावेळी आता सतीश मानशिंदे आर्यन खानची बाजू लढवत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!