मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली होती. ड्रग्ज प्रकरणात तिचे नाव समोर आले होते. तिचा ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याने रियाला एनसीबीने ताब्यात घेतले होते. ड्रग्स प्रकरणात रिया सोबत तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचे नाव समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आले होते.
अमली पदार्थ सेवन प्रकरणामध्ये मोठ्या मोठ्या अभिनेत्रींचे देखील नाव आले होते. या प्रकरणी या अभिनेत्रीची चौकशी देखील झाली. यांच्या चौकशीनंतर अद्यापही काही समोर आले नाही.
याप्रकरणी काही ड्रग्ज तस्करांसह, रिया आणि शौविकला अटक करण्यात आले होते. रिया आणि शौविकने तब्बल 3 वेळा जामीन अर्ज दाखल केला होता. एक महिन्याच्या कालावधीनंतर रियाची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, शौविकचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. आता पुन्हा एकदा शौविक चक्रवर्तीने मुंबईच्या विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे
तब्बल 4 वेळा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबईच्या विशेष एनडीपीएस कोर्टात शौविकने पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका आदेशात म्हटले होते की, एनसीबी अधिकाऱ्यांच्या समोर दिलेला कबुली जबाब अद्याप कोर्टाने स्वीकारलेला नाही, अशावेळी आरोपींना जबरदस्ती तुरूंगात ठेवता येणार नाही.’ या आदेशानंतर आता पुन्हा एकदा जामिनासाठी शौविकची न्यायालयात धाव.
महत्वाच्या बातम्या
- आक्रोश मोर्चा : मराठा आंदोलकांना रोखलं; मोजक्या आंदोलकांना बसने मुंबईला पाठवणार!
- मुक्काम वाढला!, अर्णबची आजही सुटका नाहीच
- कलम ३७० पुन्हा लागू होईपर्यंत मरणार नाही : फारूख अब्दुल्ला
- ‘फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावे’
- तब्बल सात वर्षानंतर सोबत येणार अमिताभ बच्चन आणि अजय देवगण


