Share

MPSC : जाहीर केलेल्या तारखांचं काटेकोरपणे पालन व्हावं; ओबीसी नेत्याची मागणी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोरोना काळात एमपीएससी परीक्षांचे आयोजन रखडले होते. ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा तसेच दुय्यम सेवा अराजपत्रित पूर्व परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संक्रमणाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलल्याचा जाहीर केले होते.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे या राज्य सेवा पूर्व परीक्षा व सर्व प्रकारच्या भरती परीक्षा या पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी मराठा समाज देखील आक्रमक झाला होता. दुसरीकडं, मंत्री छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांनी परीक्षा पुढे ढकलण्यास विरोध केला होता. या परीक्षा लवकरात लवकर घेण्यात याव्यात यासाठी ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरला होता.

अखेर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेल्या या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाने परीक्षा नियोजनाच्या तारखा जाहीर केल्यानंतर ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे प्रा. लक्ष्मण हाके यांनी स्वागत केलं आहे. ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना ते म्हणाले, ‘आता MPSC चे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहीर झालेल्या परीक्षांचे ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा स्वागत करीत आहोत, Upsc च्या धर्तीवर परीक्षा शेड्युल तंतोतंत पाळले जावे.’ अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, ‘ ही परीक्षा २०२० मधील जाहिरातीनुसार होणार आहे. कोरोनामुळे लांबणीवर परीक्षा पडल्यामुळे चालू (२०२१) वर्षातील जाहिरात निघून त्याचे नियोजन कधी होणार हे अस्पष्ट आहे. यामुळे उमेदवारांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे २०२० च्या या परीक्षांसोबतच २०२१ या वर्षाच्या जाहिराती काढून एकत्र परीक्षा घेण्यात यावी.

दरम्यान, मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठासमोर २५ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. आरक्षणावरील स्थगिती कायम राहणार की आरक्षण दिले जाणार या दृष्टीने ही सुनावणी महत्वाची आहे. त्यामुळे, या परीक्षांना विरोध होण्याची शक्यता आहे.

एमपीएससी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक –

राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० आता रविवार, १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही शनिवार, २७ मार्च २०२१ रोजी घेण्यात येईल. तसेच, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० ही रविवार ११ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येईल असं आयोगाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!