Share

पंढरपूरची पोटनिवडणूक झाली की राज्यात भाजप सरकार येणार; आणखी एका नेत्याच भाकीत !

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडला आहे. मतदान अवघ्या काही दिवसांवर आल्याने प्रचारसभांसह राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल पंढरपूरमधील प्रचारसभांमधून केला आहे. यासोबतच, पंढरपूरची पोटनिवडणूक झाल्यानंतर राज्यात भाजप सरकार येणार असं भाकीत देखील त्यांनी केलं आहे. ‘आता या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. ही निवडणूक झाल्यावर राज्यात भाजपचं सरकार येईल. या सरकारमध्ये ताळमेळ नसून पुढील भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे,’ असं दरेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या सभांवेळी सत्तापालटाचा स्पष्ट इशारा दिला होता. आता, फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या पाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील सरकार पडण्याचं भाकीत केलं आहे. २ मे रोजी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. हे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग लागेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!