Share

‘देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत’, जयंत पाटलांच्या वक्तव्याने संभ्रम

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी थेट लढत होत आहे. भाजपने विविध मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. निकाल लागला की महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असा दावा भाजप नेते वारंवार करत आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

‘भाजपकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नाही. म्हणून अनेक जण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. हे चित्र पाहता मला प्रश्न पडला आहे की देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का?’ असा संशय जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

भाजप प्रचार करताना सांगतंय की आम्हाला भारत भालके यांच्याबद्दल आदर आहे. तर मग ही निवडणूकच का होत आहे? मंगळवेढा पंढरपूरची जनता सूज्ञ आहे. ते नक्कीच निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून भाजपला योग्य उत्तर देतील. भाजपने ५वर्षे राजकारण केले. भारतनाना काँग्रेसचे आमदार होते म्हणून भाजपने २४गावांच्या पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. आज फडणवीस मी पंतप्रधान मोदी यांच्याकडून पैसे आणतो असा सांगावा करत आहेत. मोदी यांनी महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटी परतावा अद्याप दिला नाही तर इतर मागण्यांचे काय? असा सवालही पाटील यांनी विचारला आहे.

दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणारे. तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. हे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग लागेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत भाषणावेळी सत्तापालटाबाबत सूचक विधान केलं होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील सरकार फार काळ टिकणार नाही असं विधान केलं आहे. ‘आठवीतलं पोरगं पण सांगेल हे सरकार फार काळ टिकणार नाही. आम्हाला ते पाडण्यात रस नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत.’ असं पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!